परिशिष्ट १ : उमेदवार / विद्यार्थी करार नामा
हा करार “विद्यार्थी” किंवा “उमेदवार” आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (यच.म.मु.वि) यांच्यामध्ये “विद्यार्थी/उमेदवार” याने Accept या बटनावर क्लिक केल्यामुळे आपोआप अस्तित्वात आलेला आणि दोन्ही पक्षांना मान्य, कबूल आणि वैध असलेला मानण्यात येईल.
या करारनाम्यात “उमेदवार” या संज्ञेचा वापर अशा व्यक्तींसाठी करण्यात आला आहे की जो यच.म.मु.वि मार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षणक्रमात प्रवेश घेऊ इच्छितो आणि “विद्यार्थी” या संज्ञेचा वापर अशा व्यक्तींसाठीकरण्यात आलेला आहे, ज्या व्यक्तीने य.च.म.वि मार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षणक्रमास विहित पद्धतीचा अवलंब करून प्रवेश घेतला आहे.
उमेदवार असे मान्य व कबूल करतो की,
- त्याने माहितीपुस्तिका तसेच संगणक पडद्यावर उपलब्ध असलेल्या मजकुराचा, माहितीचा, सूचनांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला आहे आणि त्यानुसार योग्य त्या कृती केल्या आहेत.
- त्याने ही खात्री करून घेतलेली आहे की त्याने निवडलेल्या शिक्षणक्रमास तो पात्र आहे आणि जर तो माहितीपुस्तिका आणि / किंवा संगणक पडद्यावर उपलब्ध माहितीप्रमाणे अपात्र ठरत असेल तर त्याचा प्रवेश ताबडतोब रद्द करण्यात येईल आणि त्याने विद्यापीठास भरलेले शुल्क त्यास आंशिक किंवा पूर्ण स्वरुपात परत मिळणार नाही.
- त्याने त्यास अध्ययन साहित्य (पुस्तके) कोणत्या स्वरुपात (छापील पुस्तके, इ बुक,मोबाईल अॅप, दृकश्राव्य फिती ध्वनिफिती सीडीवर किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर) उपलब्ध होणार आहे याची माहिती माहितीपुस्तिकेच्या संबंधित भागातून मिळवली आहे आणि सदर स्वरुपात अध्ययन साहित्य उपलब्ध होणार आहे याबाबत त्याचे कोणतेही आक्षेप नाहीत आणि तो यापुढे कधीही अध्ययन साहित्य माहितीपुस्तिकेत दिलेल्या स्वरूपापेक्षा वेगळ्या स्वरुपात मिळण्याची मागणी करणार नाही.
- तो य.च.म.मु.वि संदर्भातील कोणतीही तक्रार किंवा इतर कोणतेही निवेदन त्यास सादर करावयाचे असल्यास अशी तक्रार किंवा निवेदन तो य.च.म.मु.विमार्फत उपलब्ध असलेल्या संगणकीय प्रणालीचा (युजर आयडीचा) वापर करून करेल. अशी तक्रार किंवा निवेदन तो तक्रार किंवा निवेदनाचे उद्भवनाऱ्या
कारणांच्या दिनांकाच्या तीस दिवसांच्या आत संगणकीय प्रणालीचा वापर करूनच करेल.
- त्यास हे मान्य व कबूल आहे की, विद्यापीठाने शिक्षणक्रम राबविण्याच्या नियमांमध्ये, अध्ययन साहित्त्यामध्ये, पाठ्यक्रमात वेळोवेळी केलेले बदल त्यास बंधनकारक असतील आणि याबाबत त्याची कोणतीही तक्रार असणार नाही.
- तो शिक्षणक्रमाच्या कालावधीमध्ये विद्यापीठात नोंदविलेल्या त्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकात बदल करणार नाही.
- त्यास हे मान्य व कबूल आहे की, त्याने नोंदणीच्या वेळेस विद्यापीठात सादर केलेल्या माहितीत बदल ककरण्यासाठी (नाव, पत्ता, फोटोग्राफ, भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख इत्यादी) योग्य ते शुल्क आकारण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहेत.
- त्यास हे मान्य व कबूल आहे की, जर विद्यापीठास शासनाकडून (शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसंदर्भात) त्याचे शुल्क प्राप्त झाले नाही तर अशा विद्यार्थ्यांनां परीक्षा देण्यास मज्जाव करण्यात येईल आणि जर परीक्षा दिलेली असेल तर त्याचा निकाल तोपर्यंत राखून ठेवण्यात येईल जोपर्यंत त्याचे शुल्क विद्यापीठास प्राप्त होत नाही.
- त्यास याचीही काल्पना आहे की, त्याच्याकडून कोणतीही असत्य, अपुरी माहिती दिली गेल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल आणि जर त्यास पदवी किंवा पदविका निर्गमित करण्यात आलेली असेल तर अशा प्रकारे असत्य, अपूर्ण माहिती मिळाल्याचे सिद्ध झाल्यावर त्याची पदवी, पदविका रद्दबातल करण्यात येईल
- तो विद्यापीठाचे संकेतस्थळ ycmou.digitaluniversity.ac OR ycmou.ac.in येथे नियमितपणे भेट देईल आणि तेथे देण्यात आलेल्या शैक्षणिक किंवा प्रशासकीय स्वरुपाच्या सूचनांचे (उदा. परीक्षा हॉल टिकिट डाउनलोड करणे आणि त्याची छपाई करणे) काटेकोरपणे पालन करील.
- तो विद्यापिठाच्या शिक्षणक्रमाचा अभ्यास अपेक्षित असलेल्या परिश्रम, शिस्त, प्रमाणिकपणे करेल. तसेच आपले वर्तन विद्यापीठाच्या सुयोग्य विद्यार्थ्यांप्रमाणे करेल आणि अशी कोणतीही कृती करणार नाही की जी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांस शोभणार नाही.
This is an agreement between the student or candidate and the YCMOU which is entered
into by virtue of the candidate for admission clicking on “ACCEPT” button on the
online admission portal at the time of admission to a program using online admission
process. In this agreement the term “candidate” is used to mean the person who proposes
to take admission to a program in YCMOU and the term “student” is used to mean a
person who has been admitted to a program of the YCMOU after fulfilling all the
conditions thereof..
The candidate undertakes that
- He has gone through the prospectus and the on-screen narrations or directions and
has sincerely responded to the on-screen directions.
- He has ensured that he is eligible to the program to which he proposes to take admission
and that if it is found otherwise, (that is, if he is found not to be fulfilling
the conditions of the eligibility at any time as per the rules mentioned in the
prospectus or the on-line narrations) his admission will be summarily cancelled
and the fees paid to the university will not be refunded in part or in full.
- The information about the medium/mode of delivery of the Study Material (for example
printed books, e-books, mobile app, audio/video material available on internet or
through CD/DVD, etc) has been duly studied by me in the relevant pages of the prospectus
and I have no objection to the said mode of delivery. He shall not make any demands
on the methods or medium of delivery other than that mentioned in the prospectus.
- He shall make any representations to the YCMOU by logging on as a student in respect
of any activities of grievances within a period of thirty days from the date of
cause of the grievances or by an email to the university at the designated e-mail
address.
- He understands that the University reserves right to make changes in the rules or
syllabi or learning material or any other policy matter as a matter of urgency and
that such changes in the rules, syllabi or policy matters shall be binding and applicable
on him and that he shall not make objections to such changes.
- He shall not change his mobile number as registered with the University during the
time of admission to the program.
- He understands that the University shall levy charges on changes in profiles of
the student, including the photograph, mobile number, date of birth, etc.
- He understands that in case the University does not receive the fees from the Government
(in case of Scholarship or Free-ship candidates), the student may be barred from
taking examinations and his results shall not be declared till such time that the
fees have been received.
- He understands that any incorrect or incomplete information given by him is liable
to cancellation of his admission or withdrawal of degree or diploma awarded to him
as and when the university gets to know of such supply of incomplete or incorrect
information.
- He shall visit the University’s website (ycmou.digitaluniversity.ac and ycmou.ac.in)
regularly and undertake necessary steps for academic and administrative purposes
as expected from him including downloading of the examination hall ticket and printing
the same.
- He shall undertake the studies of the academic program with necessary industry,
discipline and honesty and conduct himself with due dignity and shall do nothing
which is unbecoming of a student of the YCMOU.
-
I am aware and agree that, my examination center may not be my study centers.
I authorize University to send text messages to my cell phone from time to time to convey academic and administrative information.
I have no objection if details and updates about various career options or job opportunities are sent to my mobile number of email ID.